
कन्नड (प्रवीण शिंदे) ः कन्नड तालुका क्रीडा समिती व छत्रपती शिवाजी महाविद्यालय, कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज उत्साहात संपन्न झाले.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कन्नड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चाँद मेडके व उपनिरीक्षक तिलकचंद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच तालुका क्रीडा शाळा समिती सदस्य व मार्गदर्शक मुक्तानंद गोस्वामी, तालुका क्रीडा संयोजक राकेश निकम, किशोर जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेतील काही उल्लेखनीय निकाल
१०० मीटर धावणे (१४ वर्षाखालील मुले)
प्रथम – अतुल गायकवाड, द्वितीय – श्रावण नवले, तृतीय – ओमकार जाधव.१०० मीटर धावणे
(१७ वर्षांखालील मुले)
प्रथम – रामेश्वर जाधव, द्वितीय – ताले पटेल, तृतीय – दिनेश गवळी.१०० मीटर धावणे
(१४ वर्षांखालील मुली)
प्रथम – रेणुका आधाने, द्वितीय – अक्षरा लोंढे, तृतीय – साक्षी जाधव.गोळाफेक
(१४ वर्षाखालील मुली)
प्रथम – श्रद्धा जाधव, द्वितीय – कोमल गोराडे, तृतीय – श्वेता मोरे.
गोळाफेक (१४ वर्षाखालील मुलं)
प्रथम – प्रतीक चव्हाण, द्वितीय – जगदीश टोम्पे, तृतीय – अमोल खंबाट.
धावणे (१७ वर्षाखालील मुली)
प्रथम – साक्षी वैष्णव, द्वितीय – मनीषा महेर, तृतीय – धनश्री गायके.
धावणे (१७ वर्षाखालील मुले)
प्रथम – दिनेश गवळी, द्वितीय – आदित्य थोरात, तृतीय – कृष्णा जाधव.
१९ वर्षांखालील मुली
प्रथम – पायल मोकासे, द्वितीय – पुनम छानवाल, तृतीय – वैष्णवी घुगे.
१९ वर्षाखालील मुले
प्रथम – गौरव छानवाल.
पंच व आयोजकांचा उल्लेखनीय सहभाग
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच म्हणून राहुल दणके, मुकेश राठोड, अदनान पठाण, राहुल चव्हाण, रवीकुमार सोनकांबळे, कडूबा चव्हाण, निलेश पाटील, प्रशांत नवले, बाळू घुगे, ऋषिकेश पांचाळ, सतीश राठोड, अमोल गंगावणे यांनी परिश्रम घेतले.
कन्नड तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मैदानावर उमटलेला स्पर्धात्मक जोश पाहून उद्घाटन सोहळा रंगतदार झाला. आयोजकांनी पुढील दिवसांमध्ये होणाऱ्या विविध स्पर्धांबद्दल आनंद व्यक्त केला असून, विजेत्या खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.