
तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व डाॅ इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेमध्ये पाथ्री येथील राजर्षी शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य अशा एकूण पाच पदके प्राप्त केली.
या स्पर्धेत मानसी मानकापे हिने ४६ किलो वजन गटामध्ये १ सुवर्ण पदक, पायल घुगे हिने ५७ किलो वजन गटामध्ये १ सुवर्णपदक तसेच समृद्धी सांगळे हिने ६२ किलो वजन गटामध्ये १ सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच अभिषेक शिंदे याने ५४ किलो वजन गटामध्ये १ रौप्य पदक तर ७२ किलो वजन गटामध्ये ऋतुराज सुरडकर याने कांस्यपदक प्राप्त केले आहे.
या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारे महाविद्यालयाचे ३ खेळाडू फकीर मोहन विद्यापीठ, ओडिशा येथे १६ ते २० मार्च दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या पदक विजेत्या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ राम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडूंच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर, सचिव प्राचार्य उषाताई पाथ्रीकर, सहसचिव वरूण पाथ्रीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील मिरगणे, उपप्राचार्य डॉ शशिकांत बंडेवार आदी मान्यवरांनी अभिनंदन केले असून मार्च महिन्यामध्ये ओडिशा राज्यामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.