चिखली : नागपूर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने ३६ व्या सिनियर (मुले, मुली) राज्य अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन २६ ते २८ ऑक्टोबरच्या दरम्यान तालुका क्रीडा संकुल कोराडी (नागपूर) येथे आयोजित करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्हा तलवारबाजी संघासाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन १८ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता चिखली येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये आयोजन करण्यात आले आहे. निवड चाचणीसाठी येताना आधार कार्डची झेरॉक्स सोबत ठेवावी.
यावेळी पंच म्हणून अक्षय गोलांडे हे काम पाहतील तर निवड समिती सदस्य म्हणून नितीन जेऊघाले, दिलीप लांडकर असतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष शिवाजी राजे जाधव, सचिव शेषनारायण लोढे यांनी केले आहे.