
सासवड ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय, सासवड येथे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रीतम ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या टेबल टेनिस स्पर्धेत शैलेश राऊत यांना विजेतेपद मिळाले.
प्रशासकीय कर्मचारी पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात शैलेश राऊत यांनी रवी जाधव यांचा ११-३, ११-२, ११-८ असा सरळ तीन सेटमध्ये सरळ पराभव केला. तसेच तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात आकाश राऊत यांनी मच्छिंद्र जगताप यांचा ११-८, ९-११, ११-५, ११-९ असा ३ विरुद्ध १ सेटमध्ये पराभव केला.
तत्पूर्वी, झालेल्या उपांत्य सामन्यात शैलेश राऊत यांनी आकाश राऊत यांचा ११-६, ११-८, ११-५ असा ३ विरुद्ध ० असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात रवी जाधव यांनी मच्छिंद्र जगताप यांना ११-९, ११-७, ११-४ अशा गुण फरकाने पराभूत केले. विजेत्या खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ. बी. यु. माने, डॉ. संजय झगडे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रथमेश जगताप, श्रेयस जगताप व ओंकार कदम यांनी काम पाहिले.