
छत्रपती संभाजीनगर ः आंतर शालेय मल्लखांब स्पर्धेत धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय व मनपा अंतर्गत शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेमध्ये धर्मवीर संभाजी विद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी कामगिरी केली. त्यात १९ वयोगटात प्रियंका पालवे आणि १४ वयोगटात कोमल देशपांडे , प्रज्ञा राऊत, पायल पैठणे, हर्षदा घोषे यांनी चमकदार कामगिरी बजावत यश संपादन केले. १७ वयोगटात वीरा गायकवाड, अनुष्का वाघ, प्रीती प्रजापती यांनी यश संपादन केले. १४ वयोगटात वरद वायाळ, ईश्वर डोंबाळे यांची निवड करण्यात आली आहे.
या शानदार कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, संस्था सचिव निवृत्ती पाटील गावंडे, सहसचिव शिवाजी पाटील दांडगे, सर्जेराव ठोंबरे, देवजीभाई पटेल, मुख्याध्यापक लक्ष्मण मेमाणे, पर्यवेक्षक दिलीप गायके, सोमनाथ मिटे, क्रीडा विभाग प्रमुख विनायक राऊत व पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.