
सोलापूर ः अवंती नगर येथील लोकमंगल प्रशालेच्या तिघींनी शालेय शहर मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.

एसआरपी कॅम्प येथे झालेल्या या स्पर्धेत प्रणाली चव्हाण हिने १४ वर्षे वयोगटात १६ मीटर थाळी फेकून सुवर्ण पटकावले. तसेच कार्तिकी दळवी हिनेही १७ वर्षे वयोगटात १८.९५ मीटर भाला फेकत सुवर्ण पटकाविले. अस्मिता मोरे हिने भालाफेक प्रकारात तृतीय स्थान मिळविले. दोघींची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली.

या खेळाडूंना रतिकांत म्हमाणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख, अवंती शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप साठे व कार्यकारी संचालक अभयसिंह साठे व मुख्याध्यापिका शुभांगी साठे यांनी अभिनंदन केले आहे.