
सोलापूर ः अहिल्यानगर येथे झालेल्या पुणे विभागीय टेबल टेनिस स्पर्धेतून राज्य चाचणीसाठी सोलापूरच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे.
१७ वर्षे मुलींच्या गटात वेदांकिता पाटील प्रथम क्रमांकावर, १९ वर्षे मुलींच्या गटात अनुष्का रावत तिसऱ्या क्रमांकावर तर १४ वर्षे मुलींच्या गटात शिवानी सानप हिची दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली. पुढील महिन्यात अलिबाग येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी ते पात्र झाले आहेत.
सोलापूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजीव प्रधान, डॉ नितीन तोष्णीवाल, झेड एम पुणेकर व सर्व खेळाडूंनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.