
नाशिक (विलास गायकवाड) ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत नाशिक जिल्हा क्रीडा परिषद, नाशिक आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय ग्रामीण जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा (१४, १७ आणि १९ वर्षे गट) निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली

.ही स्पर्धा भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. उद्घाटन सोहळ्यास नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड, उपकेंद्रप्रमुख व क्रीडा शिक्षक गोविंद कांदळकर, पर्यवेक्षक डी के मोरे, रमेश वडघुले, यज्ञेश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधून एकूण ८१ संघांनी सहभाग नोंदविला होता. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धा नाकआउट पद्धतीने खेळविण्यात आल्या. उद्घाटनावेळी सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाचे नियम, कौशल्य आणि खेळाडूवृत्ती याबाबत मार्गदर्शन केले.

विजेत्या संघांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व संघांना भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विलास गिरी, तसेच नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड व गोविंद कांदळकर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या स्पर्धांमध्ये राजेंद्र सांगले, सनी बलसाने आणि विलास गायकवाड यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. खेळाडूंचा जोश, संघभावना आणि उत्साह यामुळे ही स्पर्धा उत्साहात, शिस्तबद्ध आणि यशस्वी वातावरणात पार पडली, असा एकमताने गौरव करण्यात आला.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१४ वर्षे गटातील विजेते संघ
मुलांचे संघ ः प्रथम – के. के. वाघ विद्याभवन व ज्युनियर कॉलेज, भाऊसाहेबनगर (ता. निफाड), द्वितीय – एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूल, भावडे (ता. देवळा), तृतीय – व्ही. के. डी. इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भावडे (ता. देवळा).
मुलींचे संघ : प्रथम – एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूल, भावडे (ता. देवळा), द्वितीय – के. के. वाघ इंग्लिश मीडियम स्कूल, काकासाहेबनगर (ता. निफाड), तृतीय – सिल्व्हर ओक युनिव्हर्सल स्कूल, नाशिक.
१७ वर्षे गटातील विजेते संघ
मुलांचे संघ : प्रथम – व्ही. के. डी. इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भावडे (ता. देवळा), द्वितीय – के. के. वाघ विद्याभवन व ज्युनियर कॉलेज, भाऊसाहेबनगर (ता. निफाड), तृतीय – रॉयन इंटरनॅशनल स्कूल, ओझर (ता. निफाड).
मुलींचे संघ : प्रथम – योगेश्वर विद्यालय, दावचवाडी (ता. निफाड), द्वितीय – के. के. वाघ इंग्लिश मीडियम स्कूल, काकासाहेबनगर (ता. निफाड), तृतीय – उन्नती माध्यमिक विद्यालय, दिंडोरी (ता. दिंडोरी).
१९ वर्षे गटातील विजेते संघ
मुलांचे संघ : प्रथम – के. के. वाघ ज्युनिअर कॉलेज, भाऊसाहेबनगर (ता. निफाड), द्वितीय – व्ही. के. डी. इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भावडे (ता. देवळा), तृतीय – कर्मवीर गणपत दादा मोरे कला व वाणिज्य महाविद्यालय, संवाद (ता. निफाड).
मुलींचे संघ : प्रथम – पं. धर्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लखमापूर (ता. सटाणा), द्वितीय – के. के. वाघ ज्युनिअर कॉलेज, काकासाहेब नगर (ता. निफाड).