
शेवगाव ः अहिल्यानगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या मान्यतेने व शेवगाव तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेत ज्ञानमाऊली तायक्वांदो अकॅडमी व ज्ञानदीप तायक्वांदो अकॅडमीच्या २२ विद्यार्थ्यानी कलर बेल्ट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
ज्ञानमाऊली इंग्लिश स्कूल मिरी रोड शेवगाव या शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एकूण २२ विद्यार्थी बसले होते. या कलर बेल्ट परीक्षेमध्ये विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या वेळी परीक्षक म्हणून अहिल्यानगर जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव व जिल्हा मुख्य प्रशिक्षक संतोष बारगजे यांनी काम पाहिले.त्यांना जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अलताफ कडकाले यांनी सहपरीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख्य पाहूणे म्हणून ॲड वर्षा सुडके या होत्या तर अध्यक्षस्थानी जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव संतोष बारगजे होते.
या सर्व विद्यार्थ्यानी उत्कृष्ट कामगिरी करून परीक्षेत यश संपादन केले आहे. संतोष बारगजे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तायक्यांदोचे नॅशनल पंच गोरक्ष गालम यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
शेवगावमध्ये चालू झालेल्य तायक्वांदो प्रशिक्षण वर्गाला वर्ष होत नाही तोच ज्ञानमाऊली अकॅडमीचे विद्यार्थी शालेय तायक्वांदो विभागीय स्पर्धेपर्यंत पोहोचले. ही बाब शेवगाव तालुक्यासाठी अभिमानची आहे. पुढील स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी नॅशनल, इंटरनॅशनल पर्यंत पोहचतील अशी ग्वाही यावेळी गोरक्ष गालम यांनी दिली.
ज्ञान माऊली इंग्लिश स्कूलचे संचालक प्रा नवनाथ सुडके, प्राचार्य डॉ युवराज सुडके, उषा ढवळे, ॲड वर्षा सुडके, मुळे, शितल हिवाळे, डॉ लांडे, डॉ वैशाली काकडे, त्रिशा तिवारी, अश्विनी शेवाळे, रोहिणी नलवडे, वर्षा काकडे, भानुदास खंडागळे, गोकुळ क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेवगाव तालुका तायक्वांदो असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक व तायक्वांदो खेळाचे नॅशनल पंच गोरक्ष गालम यांनी केले.
कलर बेल्ट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
यलो बेल्ट – मयुरी केदार, निधी पगारे, सोहम मोरे, आदित्य काकडे, अन्वी शेवाळे, राजलक्ष्मी लांडे, निलोफर शेख, अद्विता तिवारी, अयांश तिवारी, आदिराज काकडे, अन्वेशा काकडे.
ग्रीन बेल्ट – ऋग्वेदा सुडके, अक्षद क्षीरसागर, क्षितिज क्षीरसागर, आयुष खंडागळे, दिव्या ढोले, आराध्या ढवळे, अद्विता सुडके, स्वर्णिमा नलावडे, कार्तिक कुरुकवाड, श्रीमई खेडकर, मधुरा पोतांगले.