नेर प्रशालेच्या खेळाडूंचा नवा विक्रम, टेनिक्काईट स्पर्धेत सर्वच गटात अजिंक्यपद

  • By admin
  • October 18, 2025
  • 0
  • 43 Views
Spread the love

जालना जिल्हा परिषद प्रशालेचा ऐतिहासिक पराक्रम; १८ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जालना ः जालना तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेत सर्व गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून इतिहास रचला आहे. मुलांच्या तिन्ही वयोगटांमध्ये (१४, १७ आणि १९ वर्षाखालील) तसेच मुलींच्या दोन गटांमध्ये विजेतेपद मिळवून नेर प्रशालेने जिल्हा स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, जालना यांच्या वतीने आणि जिल्हा टेनिक्वाईट संघटनेच्या सहकार्याने आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील खाजगी आणि सरकारी शाळांच्या संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. सामने अत्यंत चुरशीचे आणि कौशल्यपूर्ण खेळांनी भरलेले होते

.या अद्वितीय यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा अधिकारी लता लोंढे, आरती चिल्लारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम, आशिष जोगदंड, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव तथा जिल्हा स्पर्धा आयोजक शेख चांद, शेख समीर, सोहेल खान यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.तसेच नेरचे सरपंच तेजेश कुलवंत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रम उफाड, उपाध्यक्ष सोनाजी कुलवंत, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे, विस्तार अधिकारी भरत वानखेडे, प्रशालेचे मुख्याध्यापक आर जे चव्हाण आणि सर्व शिक्षकवृंद यांनी खेळाडूंच्या यशाचे कौतुक करत त्यांना विभागीय स्तरावर अधिक यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नेर प्रशालेचा हा सर्वांगीण विजय केवळ तालुक्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जालना जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरला असून, ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

या उल्लेखनीय यशामुळे एकूण १८ मुले आणि १८ मुलींची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यापैकी १८ मुले आणि १२ मुली या नेर जिल्हा परिषद प्रशालेच्या आहेत – ही बाब शाळेच्या क्रीडा सामर्थ्याची प्रखर साक्ष आहे.

नेर प्रशालेचा विक्रमी विजय

१४ वर्षाखालील मुलांचा संघ : हंसराज जाधव, नैतिक गिरी, गौरव कुरेवाड, सागर थिटे, चैतन्य क्षीरसागर, बिलाल खान पठाण (प्रथम क्रमांक).

१७ वर्षाखालील मुलांचा संघ ः नितीन कुळवंत, यश गोरे, कृष्णा तरासे, समर्थ उफाड, ओम जाधव, कार्तिक जाधव (प्रथम क्रमांक).

१९ वर्षाखालील मुलांचा संघ : जय भारत उफाड, आदिल शाह, मारोती पुप्पलवाड, युवराज गाते, सिद्धेश्वर कोरडे, अयान शहा (प्रथम क्रमांक).

१४ वर्षाखालील मुलींचा संघ : वैष्णवी आढाव, भाग्यश्री कुळवंत, राज्यश्री कुळवंत, पूनम कुळवंत, कीर्ती शिंदे (प्रथम क्रमांक).

१९ वर्षाखालील मुलींचा संघ : गायत्री कुळवंत, न्यानेश्वरी पांडे, ऋतुजा पिसोळे, रुपाली हिवाळे, साधना आढे, आरती राठोड (प्रथम क्रमांक).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *