
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय योनेक्स सनराइज अरुण काका बलभीमराव जगताप मेमोरियल महाराष्ट्र सब जुनियर इंटर-डिस्ट्रिक्ट राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलवडे आणि नागपुरच्या दितीषा सोमकुवार यांनी मिश्र दुहेरी अंडर १७ गटात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले. तसेच सार्थक नलावडे याने मुलांच्या दुहेरी गटात अंडर-१७ व दितीषा सोमकुवारने मुलींच्या दुहेरी गटात अंडर १७ मधील कांस्यपदक पटकावले.
सार्थक नलावडेला दिलीप पंचायती, दिवेश कुमार, हिमांशु गोडबोले आणि चेतन तायडे यांचे प्रशिक्षण लाभले तर नागपूरच्या दितीषा सोमकुवारला जी बी वर्गीस यांचे प्रशिक्षण लाभले आहे.
सार्थक आणि दितीषा यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगर बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोराळकर तसेच महाराष्ट्र व छत्रपती संभाजीनगर बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, सदानंद महाजन, अर्णव रश्मीशिरीष, ऋतुपर्ण कुलकर्णी, जावेद पठाण, निकेत वराडे, अतुल कुलकर्णी, सदाशिव पाटील, परीक्षीत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.