
नागपूर ः श्री संताजी शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित संताजी महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटनच्या स्पर्धा नुकतीच विवेकानंद नगर येथील नागपूर महानगरपालिकाच्या गंगाधरराव फडणवीस बॅडमिंटन कोर्टवर संपन्न झाली.
या स्पर्धेत विद्यार्थी, विद्यार्थिनी गटात संताजी महाविद्यालय, उमाठे कॉलेज, जी एस महाविद्यालय, यशोदा महाविद्यालय, हिस्लॉप कॉलेज, के डी के, रामदेव बाबा, सीपीसी, आंबेडकर, सिम्बॉसिस, झुलेखा, शिवाजी नाईट कॉलेज, आयडियाज इत्यादी महाविद्यालयांच्या खेळाडूंचा सहभाग होता.
विजयी खेळाडूंना रोख पारितोषिक देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गटात वंश जोधानी हिस्लॉप प्रथम तर आदित्य खंडाल सीपीसी द्वितीय, विद्यार्थीनींच्या गटात राधिका चांगदे जी एस प्रथम, तर प्रांजल कावडे सीपीसी द्वितीय क्रमांक पटकावला.
आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा यशस्वी संपन्न करण्याकरिता श्री संताजी शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दिनेश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या डॉ प्रिया वंजारी, उपप्राचार्य डॉ श्रीकांत पाजनकर, डॉ निहाल शेख, डॉ श्रीकांत सोनटक्के, प्रा विजय कांडलकर, नागपूर महानगरपालिका क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर, पवार, शुभम सुपारे, मोहित, सुपन देशमुख, श्री कोल्हटकर, प्रा महेश गहरवार, जयेंद्र ढोले, डॉ अमित कन्वर, डॉ दीपक बोरकर, डॉ देवेंद्र वानखेडे, डॉ सुभाष दाढे, डॉ अमित अनुराग, डॉ प्रशांत नगरारे, डॉ रॉबिन सायमन, डॉ आर वाय देशमुख, डॉ धीरज भोस्कर, डॉ ललिता पुनैया, डॉ जयंत बुराडे, प्राचार्य डॉ आदित्य सोनी, डॉ ईश्वर कोहळे, डॉ अपूर्ब पाल, डॉ आश्लेषा इंगळे, डॉ अश्विनी सकळकळे, डॉ.आशुतोष तिवारी, डॉ नितीन जंगिटवार, प्रा चेतन महाडिक, डॉ अभिषेक लांबट, प्रिन्स गुप्ता, प्रसाद करपटे, खाईश बागडे, अथर्व काकडे, अश्विन गवते, दैदिप्य रामटेके इत्यादींचे सहकार्य लाभले. स्पर्धा संताजी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा डॉ संजय खळतकर यांच्या नेतृत्वात संपन्न झाली.