
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे पंच प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात धानोरे येथील शीतल गणेश गावडे यांनी खेड तालुक्याच्या वतीने सहभागी होऊन यशस्वीरित्या सर्व कोर्स पूर्ण केला. त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीने पंच परवाना देण्यात आला.
त्यांच्या या यशाबद्दल सुरेश शिवले, दिनेश गुंड यांनी त्यांचे अभिनंदन केले. शीतल गावडे या वाणिज्य शाखेची पदवीधर असून गावडे कुटुंबात कुस्तीचा वारसा जतन केला आहे. शालेय स्तरावर कबड्डी व कुस्ती या खेळात प्राविण्य मिळवले असून कबड्डी व कुस्ती या खेळाची मार्गदर्शक म्हणून जोग स्पोर्ट्स अकॅडमी येथे कार्यरत आहेत.