धीरज घुगे, साहिल सोनवणे, आरुषी सोलसे, पूर्वी भावसार चमकले

  • By admin
  • October 18, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

विभागीय शालेय कॅरम स्पर्धा

जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीयस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यात १४ वर्षांखालील गटात पूर्वी भावसार हिने चौथा क्रमांक तर साहिल सोनवणे याने पाचवा क्रमांक प्राप्त केला. दोघांनीही अचूकता, संयम आणि रणनीतीच्या खेळातून प्रभावी कामगिरी दाखवली. तसेच १७ वर्षांखालील गटात धीरज घुगे याने प्रथम क्रमांक (विजेता) आणि आरुषी सोलसे हिने द्वितीय क्रमांक संपादन केला. धीरज व आरुषी यांनी उल्लेखनीय कौशल्य आणि लक्ष केंद्रित ठेवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

या चारही खेळाडूंनी विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या यशामागे शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी, तसेच शिक्षक रूपाली वाघ, मनोज दाडकर, प्रशिक्षक आयेशा खान, आणि क्रीडा शिक्षक श्वेता कोळी व आकाश धनगर यांचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय विजयाबद्दल विद्यार्थ्यांचे शाळेत, संस्थेत तसेच पालकवर्गात आनंदाचे व अभिनंदनाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरातून या युवा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *