
सोलापूर ः शालेय शहर क्रॉस कंट्री व मैदानी स्पर्धेत जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशालेच्या साईश्वर व श्रद्धा गुंटूक बंधू भगिनीनी ४ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई केली. या कामगिरीवर त्यांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
१९ वर्षे वयोगटात साईश्वरने क्रॉसकंट्री स्पर्धेत व ३००० मीटर धावणेमध्ये प्रथम व १५०० मीटर धावणेमध्ये द्वितीय स्थान मिळविले. श्रद्धा हिने ४×४०० मीटर रिले व ४×१०० मीटर रिले या दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला तसेच १५०० मीटरमध्ये द्वितीय स्थान संपादन केले.
प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे, चिदानंद माळी , क्रीडा शिक्षक कृष्णा कोळी, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी बाबुराव धनशेट्टी व निवृत्त पोलीस अधिकारी शिवकुमार बागलकोटी यांनी साईश्वर व श्रद्धा यांचे अभिनंदन केले.