
सुवर्णपदक विजेते खेळाडू आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज
मुंबई : २४ वी मुंबई उपनगर ज्युनियर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा आणि १० वी पुमसे ज्युनियर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे सोमवारी (२० ऑक्टोबर) सेंट अँथनी हायस्कूल, साकीनाका येथे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन सेंट अँथनी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका लिडा सॅन्टीस तसेच मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाचे संजय घोडके (एनआयएस), संदीप येवले (अध्यक्ष), संदीप चव्हाण (सचिव), कल्पेश गोलांबडे (खजिनदार) आणि संतोष कुंभार (सदस्य) यांच्या हस्ते पार पडले.

उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत सांगितले की, “तायक्वांदो हा खेळ शिस्त, वेग आणि मानसिक ताकद शिकवतो. राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याची ही सुवर्णसंधी आहे.”
या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली पात्रता मिळवली आहे. हे खेळाडू आता रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वॉदो स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सुवर्णपदक विजेते – पुमसे विभाग
वैयक्तिक गट: सारा येवले, वेदांत पडवळ
पेअर गट: दीपेश शिंदे, गायना बोरकर
ग्रुप (मुली): सोनम धोपटे, मैत्री सावंत, गायना बोरकर
ग्रुप (मुले): राज कांबिरे, वेदांत पडवळ, दीपेश शिंदे
या सर्व खेळाडूंना आयोजक आणि प्रशिक्षक मंडळींनी पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, प्रशिक्षक व संघटकांचे योगदान उल्लेखनीय राहिले.