
जळगाव ः गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या सब ज्युनिअर मुलं व मुली निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर दरम्यान दिवाळीच्या शुभ प्रसंगी खेळाडूंना संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून गोड खाऊ वाटला आणि एक आगळावेगळा प्रेरणादायी संदेश दिला.
फारूक शेख यांनी सांगितले की, “खेळाडू जात-पात, धर्म-पंथ यांच्या भिंती ओलांडून एकतेचा आणि माणुसकीचा खरा अर्थ जगाला दाखवतात. तुम्ही मैदानावर खेळत नाही, तर मानवतेचा ध्वज उंचावता!”
फारूक शेख यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना आवाहन केले की, “या शिबिरात तुम्ही घाम गाळा, मेहनत करा, आणि राज्यस्तरीय स्पर्धेत बेस्ट फोर मध्ये स्थान मिळवाल तर तुम्हाला मोठं गिफ्ट देऊन सन्मानित केलं जाईल ! पण त्याहीपेक्षा मोठं गिफ्ट म्हणजे – समाजात एकतेचा, सन्मानाचा आणि मानवी बंधुत्वाचा विजय!”
त्यांनी पुढे सांगितले की, “दिवाळीच्या गोडव्याप्रमाणे आपल्या नात्यामध्ये आणि विचारांमध्ये गोडवा मिसळू द्या! खेळ फक्त मैदानावर नको – आपल्या मनात, समाजात आणि राष्ट्रातही खेळा, आणि मानवतेचा सामना जिंका !”
शिबिरातील सर्व खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला आणि मानवतेचा संदेश पसरवण्याचा निर्धार केला. दिवाळीच्या या विशेष क्षणी फुटबॉल मैदानावर एक वेगळाच “प्रेरणेचा दिवा” पेटला!
याप्रसंगी मुख्य कोच राहिल अहमद, कोच थॉमस, हिमाली बोरोले, उदय फालक, वसीम रियाज, प्रशासकीय अधिकारी तौफिक शेख, ममता प्रजापत, संघटनेच्या कार्याध्यक्ष डॉ. अनिता कोल्हे, संचालिका छाया बोरसे पाटील यांची उपस्थिती होती.