
छत्रपती संभाजीनगर ः विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित आंतर शालेय राज्यस्तरीय वुशू स्पर्धेमध्ये देवगिरी महाविद्यालयाच्या शर्वरी राठोड हिने १७ वर्षांखालील ६० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण कामगिरीमुळे शर्वरीची निवड श्रीनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आणि आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य प्रा अरुण काटे, उपप्राचार्य प्रा विजय नलावडे, उपप्राचार्य प्रा ज्ञानेश्वर हिवरे, दर्शना गांधी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या खेळाडूला क्रीडा विभाग प्रमुख प्रा राकेश खैरनार तसेच प्रा कृष्णा दाभाडे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रा मंगल शिंदे, प्रा अमोल पगारे आणि प्रा शुभम गवळी यांचे सहकार्य लाभले आहे.