सह्याद्री कदमची कर्णधारपदी निवड
पुणे ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १९ महिला टी २० ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा अंडर १९ महिला संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी सह्याद्री कदम हिची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव अॅड कमलेश पिसाळ यांनी अंडर १९ महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार आणि अपेक्स परिषदेचे चेअरमन सचिन मुळे, राजू काणे यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र अंडर १९ महिला संघात सह्याद्री कदम (कर्णधार), ईश्वरी अवसरे, भाविका अहिरे (उपकर्णधार), सिमरन डबास, सुहानी कहांडळ, अस्मी कुलकर्णी, आर्य उमप, अक्षया जाधव, गायत्री सुरवसे, जितेश्री दामले, समिधा चौगुले, वैष्णवी म्हाळसकर, भक्ती पवार, जान्हवी वीरकर, निकिता सिंग, प्रेरणा सावंत या खेळाडूंचा समावेश आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा पहिला सामना २६ ऑक्टोबर रोजी गोवा संघाशी होणार आहे. हा सामना कांदिवाली येथे सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर होणार आहे. या सामन्यानंतर महाराष्ट्र संघाचे सामने हैदराबाद (२७ ऑक्टोबर), केरळ (१९ ऑक्टोबर), दिल्ली (३१ ऑक्टोबर) व छत्तीसगड (२ नोव्हेंबर) यांच्याशी होणार आहे. या स्पर्धेचे बाद फेरीचे सामने ६ नोव्हेंबर रोजी होतील. उपांत्य सामने १० नोव्हेंबर रोजी होणार आहेत. अंतिम सामना १२ नोव्हेंबर रोजी होईल अशी माहिती सचिव कमलेश पिसाळ यांनी दिली.



