मुंबई ः मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील निवड समितीने १९ वर्षांखालील विनू मांकड ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर केला आहे.
निवड समितीचे अध्यक्ष रवी कुलकर्णी, प्रशांत सावंत, झुल्फिकार पारकर, अमित दाणी, उमेश गोटखिंडकर यांच्या समावेश असलेल्या निवड समितीने अंडर १९ क्रिकेट संघ जाहीर केला.
मुंबई अंडर १९ क्रिकेट संघात आर्यन सकपाळ (कर्णधार), अभिज्ञान कुंडू, वसीम खान, हर्ष आघाव, हर्ष गायकर, अनिरुद्ध नायर, आर्यन चौहान, यासीन सौदागर, नमन पुष्पक, अभय पटेल, अगस्त्य बंगेरा, हिमांशू सिंग, वेदांत बने, आर्यन पाटील, तनिश शेट्टी व मीत पाटील यांचा समावेश आहे.



