पुणे ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाकडून महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनानुसार राज्यातील पुरग्रस्त भागातील आर बी अट्टल महाविद्यालयास (गेवराई, जि. बीड) येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या शैक्षणिक साहित्यात स्कूल बॅग, पाणी बॉटल, बॉलपेन पाकिट, पेन्सिल किट, एक्झाम पॅड, फोल्डर, ए कॉलेज नोटबुक १ डझन, एक आकाश कंदील असे १०० कीट वाटण्यात आले. एका किटची किंमत ११०० रुपये असून एकूण १,१०,००० रुपये किंमतीच्या शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक यांनी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने सढळ हाताने केलेल्या मदतीतून पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत करण्यासाठी या शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम आर बी अट्टल महाविद्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमास अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ नितीन घोरपडे, आर बी अटल महाविद्यालयाचे प्राचार्य रजनी शिखरे उपस्थित होते.
या प्रसंगी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ नितीन घोरपडे, आर बी अट्टल महाविद्यालयाचे प्राचार्य रजनी शिखरे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये सोनाली अजित घुले यांनी १०० सॅक देऊन भरीव मदत केली.
या प्रसंगी उपप्राचार्य प्रा अनिल जगताप, प्रा ऋषिकेश मोरे, डॉ वैशाली पेटके, डॉ कुरूपवाड, प्रा विजय सांगळे, डॉ प्रदीप दहिंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा जी पी सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ प्रदीप दहिंडे यांनी मानले. या निधी संकलन मध्ये राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना, करिअर कट्टा आणि विद्यार्थी विकास मंडळ या समितीच्या शिक्षक व १६५ विद्यार्थ्यां सहभागी झाले होते.



