अडसूळ ट्रस्ट सुपर लीग शालेय कॅरम स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारपासून रंगणार

  • By admin
  • October 24, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व कोकण क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने होणाऱ्या अडसूळ ट्रस्ट-कोकण कप सुपर लीग विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारपासून दादर, पूर्व येथे रंगणार आहे.

अंतिम फेरीसाठी ४० खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पाच टप्प्यामधील निवड चाचणी मोफत शालेय कॅरम स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातील एकूण २१८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यामधून निवड झालेल्या शालेय ४० खेळाडूंची स्विस लीग पद्धतीने साखळी सहा फेऱ्यांची स्पर्धा २५ व २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वा.पासून दादर-पश्चिम येथील सिबिईयुएम सभागृहात रंगणार आहे.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आनंदराव अडसूळ ट्रस्टतर्फे उन्हाळी सुट्टीपासून सुरु झालेल्या मोफत मार्गदर्शन व आकर्षक पुरस्कारांसह विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धांच्या विनाशुल्क उपक्रमामुळे सहभागी खेळाडूंचा स्तर उंचावला. परिणामी सहभागी अनेक खेळाडूंनी डीएसओ शालेय कॅरम स्पर्धेत प्राविण्य देखील मिळवले. चॅम्पियन कॅरम बोर्डावर सरावाचे सातत्य नसल्यामुळे अनेक नवोदित खेळाडू स्पर्धात्मक खेळातून लवकर बाद होत असल्याची समस्या अनेक पालक वर्गाने संयोजकांच्या निदर्शनास आणली. म्हणूनच त्यांना देखील संधी देण्याचा प्रयत्न यंदाच्या सुपर लीग मोफत कॅरमच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण व प्रमोद पार्टे यांनी दिली.

पूर्व नियोजित टॉप-२० ऐवजी पुढीलप्रमाणे टॉप-४० शालेय खेळाडूंची सदर स्पर्धेसाठी निवड जाहीर केली आहे. प्रसन्न गोळे, उमैर पठाण, आर्यन राऊत, पुष्कर गोळे, तीर्थ ठक्कर, केवल कुलकर्णी, मनन भलाला, वेदांत मोरे, जितेंद्र जाधव, सार्थक घाडीगावकर, अर्णव पवार, श्लोक शिंदे, श्रेयस जायभाये, सुशांत कदम, ओम सुरते, रविराज गायकवाड, समर्थ मोरे, बालाजी कठुरोजीगिरी, शौर्य दिवेकर, शिवांश मोरे, आरव आंजर्लेकर, विराज बर्वे, दुर्वेश चव्हाण, शंभू धुरी, ओमकार लोखंडे, चैतन्य पोमेंडकर, यश गोळे, वेदांत हळदणकर, स्वरूप आंब्रे, तनया दळवी, ग्रीष्मा धामणकर, श्रेया पवार, वेदिका पोमेंडकर, तीर्था कुलकर्णी, आर्या सोनार, उत्कर्षा कदम, अरीशा खान, शिझा खान, मारिया शेख व हर्षदा रसाळ यांचा टॉप-४० मध्ये समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *