युक्ती राजपूत कर्णधार, इशा ढाके उपकर्णधार
जळगाव : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थात महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा राज्यस्तरीय १४ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा शिरपूर येथे २६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला असून, युक्ती राजपूत हिची कर्णधार तर इशा ढाके हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी या संघाची घोषणा केली. या वेळी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ वर्षा पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत संघटनेच्या कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे, सहसचिव भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, छाया बोरसे, आमिर शेख, मुख्य प्रशिक्षक राहील अहमद, तसेच संघ व्यवस्थापक म्हणून हिमाली बोरोल आणि प्रशिक्षक म्हणून थॉमस उपस्थित होते.
या निवड प्रक्रियेत संघ निवड समितीचे सदस्य तौसिफ शेख, वसीम रियाज, साबीर खालिद, वसीम चांद आदी मान्यवर सहभागी झाले होते.
लढा आणि जिंका – डॉ वर्षा पाटील
खेळाडूंना प्रोत्साहित करताना डॉ वर्षा पाटील म्हणाल्या, “स्पर्धेत आत्मीयतेने खेळा, जिद्दीने लढा आणि विजय मिळवा. सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा.”
जळगावचा मुलींचा संघ
युक्ती राजपूत (कर्णधार, गोलकीपर), इशा ढाके (उपकर्णधार), एलिना फ्रान्सिस, साक्षी बानायत, सिद्धी ठाकरे, दिव्या बाविस्कर, परी रंगलानी, अश्विनी ठाकूर, संस्कृती पाटील, तीरथा नन्नावरे, युगा पाटील, धन्यता सोनावणे, दर्शना मोरे, हिमानी भुसारी, छायनगी येसे, लावण्या सूर्यवंशी, पलक जाडीया, नेहा चव्हाण, फाल्गुनी खडके आणि अवनी पवार (सेकंड गोलकीपर).
जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून, या युवा संघाकडून राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



