खेळाडूंच्या दमदार कामगिरीने ‘विभागीय क्रीडा संकुल’ दुमदुमले
नाशिक : मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत अभेद्य वर्चस्व प्रस्थापित केले. विविध क्रीडा प्रकारांत घवघवीत यश मिळवत महाविद्यालयाने जिल्ह्यातील अग्रस्थान मिळविले.
या स्पर्धेत १७ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील गटातील खेळाडूंनी विशेष कामगिरी बजावली. स्पर्धेच्या प्रत्येक विभागात महाविद्यालयातील खेळाडूंनी विजेतेपद पटकावत आपल्या मेहनतीचा ठसा उमटवला.
रिले स्पर्धांतील चमकदार कामगिरी
महाविद्यालयाच्या संघाने ४x४०० मी. आणि ४x१०० मी. रिले स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या विजयी संघात ज्ञानेश्वर वळी, सार्थक सनानसे, कृष्णा बोराडे, गोविंद पाडेकर आणि दिनेश पाडवी या खेळाडूंनी उल्लेखनीय खेळ कौशल्य दाखवले.
प्रशिक्षण व मार्गदर्शन
खेळाडूंच्या या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस जगदाळे, उपप्राचार्या डॉ सुचिता सोनवणे आणि क्रीडा संचालक प्रा किशोर राजगुरू यांचे सततचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचे मोठे योगदान आहे.
संस्थेचा गौरव व अभिनंदनाचा वर्षाव
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ प्रशांत हिरे, समन्वयक डॉ अपूर्व हिरे, कोषाध्यक्षा डॉ स्मिताताई हिरे, विश्वस्त डॉ संपदा हिरे, डॉ अद्वय हिरे (पाटील) तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा डॉ योगिता हिरे यांनी खेळाडूंच्या या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव केला.
प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, पर्यवेक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी या विजयी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू आज ग्रामीण महाराष्ट्रातील क्रीडा उर्जेचे जिवंत उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या या कामगिरीतून महाविद्यालयाच्या क्रीडा संस्कारांची झलक दिसते,” असे मत संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
१७ वर्षाखालील गटातील कामगिरी
१५०० मी. व ३००० मी. धावणे : शकीला वसावे – प्रथम
३ किमी चालणे : अश्विनी चौधरी – प्रथम
३००० मी. धावणे : देविदास देशमुख – प्रथम, जय बोराडे – द्वितीय
१५०० मी. धावणे : कृष्णा मोंढे – प्रथम
८०० मी. व ४०० मी. धावणे : सूरज मुकणे – प्रथम
४०० मी. धावणे (मुली): श्रीया सिंग – प्रथम
१९ वर्षाखालील गटातील विजेते
४०० मी. धावणे : किसान पावरा – प्रथम
१०० मी. धावणे : सार्थक सनानसे – प्रथम, कुणाल शिंदे – द्वितीय
२०० मी. धावणे : सार्थक सनानसे – प्रथम, आयुष बोडके – द्वितीय
४०० मी. हार्डल्स : ज्ञानेश्वर वळी – प्रथम, दिनेश पाडवी – तृतीय
५ कि.मी. चालणे : कार्तिक बोरसे – प्रथम
३ कि.मी. चालणे : सुवर्ण हिरकुड – प्रथम
क्रॉस कंट्री (मुली): सुवर्ण हिरकुड – प्रथम
क्रॉस कंट्री (मुले): गोविंद पाडेकर – प्रथम
३००० मी. धावणे : गोविंद पाडेकर – प्रथम
८०० मी. व १५०० मी. धावणे : कृष्णा बोराडे – प्रथम
३००० मी. धावणे (मुली): अंजली पंडित – प्रथम
१५०० मी. धावणे (मुली): अंजली पंडित – तृतीय
थाळीफेक व गोळाफेक : रोशन जाधव – प्रथम
लांब उडी : जानवी खैरनार – द्वितीय



