नागपूर ः सुरत येथे होणाऱ्या सिनियर महिला टी-२० ट्रॉफी सुपर लीग सामन्यांमध्ये दिशा कासट ही १६ सदस्यीय विदर्भ संघाचे नेतृत्व करणार आहे. गुरुवारी झालेल्या व्हीसीएच्या महिला निवड समितीने दोन स्टँडबाय खेळाडूंचीही नावे जाहीर केली.
विदर्भ सिनियर महिला टी २० संघात दिशा कासट (कर्णधार), भारती फुलमाळी (उपकर्णधार), लतिका इनामदार, मोना मेश्राम, अंकिता भोंगाडे, मानसी पांडे, रिद्धी नाईक, श्रेया लांजेवार, आदिती पालांदूरकर, सायली शिंदे, नुपूर कोहळे, आरती बहेनवाल, तृप्ती लोढे, कोमल झांजड, आर्या गोहणे, गार्गी वानकर यांचा समावेश आहे. राखीव खेळाडू म्हणून आयुषी ठाकरे व रुपाली सहारे यांची निवड करण्यात आली आहे.
सपोर्ट स्टाफमध्ये प्रशिक्षक नूशीन अल खादीर, सहाय्यक प्रशिक्षक अक्षय कोल्हार, एस अँड सी प्रशिक्षक हर्षा बोकडे, फिजिओ मधुरा काळे, व्हिडिओ विश्लेषक रोहित पेज, साइड-आर्म बॉल थ्रोअर यश सिरसाट आणि व्यवस्थापक तृणाली धामणकर यांचा समावेश आहे.



