हार-जीत यापेक्षा खेळाडूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे – जितेंद्र माळी 

  • By admin
  • October 24, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

नंदुरबार : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे उद्घाटन प्रतिष्ठित क्रीडा व्यक्तिमत्त्व डॉ जितेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन समारंभात बोलताना डॉ माळी यांनी सांगितले की, हार-जिंकणे नव्हे, तर खेळाडूंना प्रोत्साहन देणे हे महत्त्वाचे आहे. त्यांनी विशेषतः मुलींना निर्भय आणि निडर राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. “मार्शल आर्टस सारख्या खेळात मुलींनी जास्तीत जास्त सहभागी होऊन स्वतःचे आत्मसंरक्षण शिकावे, ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन प्रसंगी क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर, राष्ट्रीय पंच योगिता बैसाने, निता मराठे, क्रीडा प्रशिक्षक उमेश राजूपत, मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक संतोष मराठे, प्रमोद बैसाने, डॉ दिनेश बैसाने, नितीन मगरे, आणि ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव गणेश मराठे उपस्थित होते.

स्पर्धेत पंच म्हणून पवन बिऱ्हाडे, विशाल सोनवणे, गणेश गोसावी काम पाहत होते, तर टाईमकीपर हर्ष चावला आणि टेबल जज प्रतीक खंडेलवाल यांनी कार्य पाहिले. शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे निरीक्षण क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर यांनी केले.सर्व विजयी खेळाडू नाशिक येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. सूत्रसंचालन गणेश मराठे यांनी केले तर आभार उमेश राजूपत यांनी मानले.

पदक विजेते खेळाडू

१४ वर्षांखालील मुली : खुशी नाईक, कोमल शिंदे, रिद्धी जयस्वाल, अक्षदा बैसाने – प्रथम

१७ वर्षांखालील मुली : रोशनी आहेर, सोनिया ठाकूर, केतकी पाटील – प्रथम

१९ वर्षांखालील मुली: संजना सिंग, वैष्णवी अहिरे, प्रांजल बैसाने – प्रथम

१४ वर्षांखालील मुले: चेतन पटले, रोशन पावरा, तनय सोपनार – प्रथम

१७ वर्षांखालील मुले: यशवंत वसावे, आदित्य निकुंबे, सुमित चौधरी – प्रथम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *