ठाणे ः गुरुवर्य वसंतराव पाटील यांना वसंतसागर पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. सोनाई फाऊंडेशन आयोजित वसंत सागर पुरस्कारांच्या माध्यमातून सामाजिक , सहकार, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात येते.
वसंतराव पाटील हे मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व श्री गणेश आखाड्याच्या माध्यमातून करत असलेल्या कुस्ती या क्रीडा क्षेत्रातील कार्य मोलाचे आहे. समाजाला प्रेरणादायी दिशादर्शक आहे. या कार्याची दाखल घेऊन सोनाई फाऊंडेशन मुंबईचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी नायकवडी यांनी हा “वसंतसागर पुरस्कार २०२५” जाहीर केला.
हा पुरस्कार दत्त सेवा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आनंदराव माईंगडे, सहाय्यक विक्रीकर आयुक्त किरण जाधव, राष्ट्रीय नेमबाज नमिता पाटील, उद्योजक यूनिटी इंडस्ट्रीजचे रामदास शिंगारे आदी मान्यवरांच्या हस्ते रविवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब वाशी (एन बी सी) या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.
श्री गणेश आखाडा परिवार व समस्त मिरा भाईंदरवासी व अंत्री बुद्रुक वासियातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.



