छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांनी आयोजित केलेल्या शालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या विभागीय क्रीडा संकुल येथे प्रशिक्षक विठ्ठल नरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन केले आहे. एकूण ११ खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी विभागीय संघात निवड झाली आहे.
सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, गणेश पाळवदे, समीर शेख, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, सहसचिव भिमराज रहाणे, डॉ हरीश नागदकर, ममता खिची, आशुतोष खिची, अशोक जंगमे, विठ्ठल नरके, विशाल वाघचौरे, दीपक सुरडकर, विक्रम लाहोट यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी अखिलेश काळे, शंतनू साळुंखे, भूमन रेड्डी, कौस्तुभ देव, कबीर गायकवाड, सुमित बरांडे, ऋतुजा उणे, अनन्या शेळके, वैभवी आवारे, ध्रुवी देशपांडे, संस्कृती कोरडे या खेळाडूंची निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक विठ्ठल नरके यांचे प्रशिक्षण मिळत आहे.



