जळगाव : अरुणाचल प्रदेश येथे २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या ७५-८० किलो वजन गटात गौरवी पंकज गरुड हिची अखिल भारतीय सीबीएसई स्कूल संघामध्ये निवड झाली आहे.
गौरवी गरुड हिला जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रशिक्षक निलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ सचिन वाणी, डॉ सारिका वाणी, सुरज नेमाडे, राकेश पाटील, राकेश पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, विशाल सोनावणे व शारदा पाटील यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



