शिरपूर ः श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई, संचलित तांडे शिरपूर येथील मुकेश आर. पटेल निवासी सीबीएसई शाळेचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी जवीन पुजारी याने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले.
प्रथम स्थान प्राप्त करीत जवीन पुजारी हा हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. जवीनला प्रशिक्षक शुभम कदम व सविता देशमुख यांनी प्रशिक्षण दिले आहे.
जवीनच्या या यशाबद्दल एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सहअध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, एसव्हीकेएम स्कूल डायरेक्टर गिरीजा मोहन, शाळेच्या प्राचार्या मंजु सिंह, एसव्हीकेएम स्पोर्ट्स डायरेक्टर किरण आंचन, असिस्टंट स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ आशिष शुक्ला, क्रीडा समन्वयक धीरज पाटील यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



