मुंबई : दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी माहुल यांच्या वतीने १४ आणि १६ आणि १९ वर्षांखालील मुलांसाठी माहुल, चेंबूर येथील अकादमीच्या मैदानावर २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीत भाग घेण्यास उत्सुक असलेल्या मुलांनी वरील वेळेत पूर्ण क्रिकेट गणवेशात माहुल येथील अकादमीच्या मैदानात वयाचा दाखला घेऊन उपस्थित राहावे.
१४ वर्षाखालील गटासाठी – ०१/०९/२०११ ते ३०/०८/२०१३ या कालावधीतील जन्म असलेली मुले निवड चाचणीसाठी पात्र ठरतील.
१६ वर्षाखालील गटासाठी – ०१/०९/२००९ ते ३०/०८/२०११ या कालावधीतील जन्म असलेली मुले निवड चाचणीसाठी पात्र ठरतील.
१९ वर्षाखालील गटासाठी – ०१/०९/२००६ ते ३०/०८/२००९ या कालावधीतील जन्म असलेली मुले निवड चाचणीसाठी पात्र ठरतील.



