भद्रावती येथे राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेचे आयोजन

  • By admin
  • October 26, 2025
  • 0
  • 53 Views
Spread the love

भद्रावती (जि. चंद्रपूर) : खेलो इंडिया, क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया मान्यताप्राप्त पारंपारिक भारतीय शस्त्रकला सिलंबम या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी “शिवराय चषक राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धा -२०२५” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला महाराष्ट्राचे आद्य महापुरुष राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन स्वरूपात विशेष समर्पण करण्यात आले आहे.

ही राज्यस्तरीय स्पर्धा १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे पार पडणार असून राज्यभरातील नामवंत खेळाडू, प्रशिक्षक आणि शस्त्रकला तज्ज्ञ यात सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेत लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा-सुरुल, हरणाची शिंगे यांसारख्या पारंपारिक भारतीय युद्धकलेतील विविध प्रकारांचा समावेश असून खेळाडूंना शारीरिक कौशल्याबरोबरच परंपरेची जाण मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

या भव्य उपक्रमाचे आयोजन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे करण्यात आले असून संस्था सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र, सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनल सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशन यांच्याशी संलग्न आहे.

या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक संजय बनसोडे, इंटरनॅशनल सिलंबम एक्सपर्ट कोच आणि रेफरी, तसेच संस्थापक व अध्यक्ष, सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील युवकांमध्ये भारतीय शस्त्रकला आणि संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण व्हावी असा हेतू व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख दुर्गराज एन रामटेके, विदर्भ प्रमुख – सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (चंद्रपूर), तसेच बी एल करमनकर, सचिव – चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर सिलंबम असोसिएशन हे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यरत आहेत.

सिलंबमसारख्या प्राचीन भारतीय युद्धकलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत असून, “शिवराय चषक” महाराष्ट्राच्या पारंपारिक क्रीडा इतिहासात एक नवा अध्याय लिहिणार आहे. अधिक माहितीसाठी संजय बनसोडे (7776890606) व बी एल करमनकर (9067758618) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *