नवी दिल्ली ः भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका नुकतीच संपली आहे. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. एकदिवसीय सामन्यांनंतर, भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. ही पाच सामन्यांची मालिका २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान चालेल. भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उर्वरित खेळाडू या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेत पाच सामने असतील, ज्याची सुरुवात २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे पहिल्या सामन्याने होईल. मालिकेचा शेवटचा सामना ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेन येथे खेळला जाईल. टी-२० सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:४५ वाजता सुरू होतील.
टी २० मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-२० – २९ ऑक्टोबर, कॅनबेरा
दुसरा टी-२० – ३१ ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरा टी-२० – २ नोव्हेंबर, होबार्ट
चौथा टी-२० – ६ नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवा टी-२० – ८ नोव्हेंबर, ब्रिस्बेन
टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर.
टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिच मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि अॅडम झाम्पा.



