राज्य स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरचा नेटबॉल संघ जाहीर

  • By admin
  • October 27, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

पुरुष संघाचे नेतृत्व आकाश सरदारकडे; महिला संघाची कर्णधार मेघा पठारे

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र एमेच्युअर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि औरंगाबाद जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या वतीने २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान गारखेडा विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे १९ वी महाराष्ट्र राज्य महिला आणि पुरुष नेटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाची निवड चाचणी १९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक उत्कृष्ट खेळाडूंनी सहभाग नोंदवत दमदार खेळाचे प्रदर्शन केले. निवड समितीने केलेल्या मूल्यमापनानंतर २६ ऑक्टोबर रोजी अंतिम संघांची घोषणा करण्यात आली.

पुरुष विभागात राष्ट्रीय खेळाडू आकाश भाऊराव सरदार याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली असून जयवर्धन सतीश इंगळे याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. महिला संघाचे नेतृत्व मेघा अनिल पठारे हिच्याकडे सोपविण्यात आले असून आकांक्षा जयेश मगरे हिला उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

संघाचे प्रशिक्षक हर्षवर्धन मगरे आणि संकेत बोन्गार्गे, तर व्यवस्थापक सचिन दांडगे आणि अबुतालीब अन्सारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन्ही संघातील खेळाडूंना राज्य संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा संघटनेचे सचिव सतीश इंगळे, तसेच धर्मेंद्र काळे, सुनील डावकर, राजकुमार मुंबरे, आप्पासाहेब शेळके, अनिल कांबळे, रमेश प्रधान, हर्षवर्धन मगरे, मनोज बनकर, नितेश साबळे, कुणाल नरवडे, दिलीप जाधव, निलेश भगत, कुणाल बोर्डे, शुभम गायकवाड, रोहन काळे, रोहित बोर्डे, रोहिदास गाडेकर, जीवनसिंग चव्हाण आणि स्तुती पाटोळे आदींनी शुभेच्छा देत संघाचे अभिनंदन केले.

छत्रपती संभाजीनगरचे संघ

पुरुष संघ : आकाश सरदार (कर्णधार), जयवर्धन इंगळे (उपकर्णधार), अनिल वाघमारे, विक्की शेजूळ, विक्रमसिंग कायटे, सनी देहाडे, अजय राजपूत, भगवान बारबैले, रितेश दाभाडे, राजवर्धन इंगळे, संतोष शिरसाट, गणेश महाले.

महिला संघ : मेघा पठारे (कर्णधार), आकांक्षा मगरे (उपकर्णधार), प्राची बागुल, पूजा सोनवणे, दिपाली प्रधान, नंदिनी बनकर, दिपाली काळे, वैष्णवी खरात, साक्षी जाधव, मानसी वायकोस, तनिशा बनकर, रिद्धी सोनवणे.

छत्रपती संभाजीनगर संघाकडून या राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, खेळाडूंनी उत्कृष्ट तयारी केली असल्याची माहिती संघटनेचे सचिव सतीश इंगळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *