छडवेल कोर्डे : साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या २००६-०७च्या दहावीची बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेले ‘गेट-टुगेदर’ स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडले. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आणि विश्वस्त यू एल बोरसे सर यांनी भूषवले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संजय कुमार पाटील, तसेच माजी व आजी शिक्षक बी ए नांद्रे, एस आर पाटील, डी ए पानपाटील, बी डब्ल्यू पाटील, ए आर खैरनार, जी एम बागुल, बी एस बागुल, ए सी राऊत, श्रीमती पवार, श्रीमती राऊत, हेमंत बेडसे, नितीन बेडसे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी टी एम माळी, युवराज बेडसे, सुनील बेडसे, उमेश बेडसे, संजय भिल आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मित्र-मैत्रिणींपैकी दिपाली मोहिते, ज्योती अहिरे, दिपाली जगताप, लता पाटील, करिष्मा बेडसे, लीना पेंढाकर, राकेश ठाकरे, रमेश बेडसे, राहुल पाटील, कल्पेश अहिरे, शाहरुख पठाण, सचिन महाले, धनंजय कांबळे यांनी आपल्या जीवनातील प्रवास, आठवणी आणि अनुभव भावनिक शब्दांत मांडले. मैत्रीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने अनेकांचे डोळे पाणावले.
त्यानंतर उपस्थित शिक्षक व शाळेचे प्राचार्य संजय कुमार पाटील, बी डब्ल्यू पाटील, बी ए नांद्रे, एस आर पाटील, ए आर खैरनार व श्रीमती पवार मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी एसएससी बॅच २००६-०७ च्या विद्यार्थ्यांनी शाळेस बैठकीच्या व्यवस्थेसाठी १२ खुर्च्या भेट म्हणून दिल्या. तसेच, आपल्यातून गेलेल्या दिवंगत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि जुन्या मित्रांसाठी एका लहान व्हिडिओ शोद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र भोजन करून मैत्रीचा धागा अधिक बळकट केला आणि आगामी काळात पुन्हा भेटण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील, दिपाली जगताप आणि लता पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन खामकर यांनी केले. सचिन साळुंखे, अनिल कोळी, गंगाधर भदाणे, शाहरुख पठाण, रोहित बोरसे, जितेंद्र बेडसे, हेमराज भदाणे, रोहिदास बेडसे, दादाभाई सोनवणे, कल्पेश पवार, योगेश कोळी, समाधान सोनवणे, भूषण बेडसे, जयेश बोरसे, मनमोहन अहिरे, भाग्यश्री पवार, रुपाली अहिरे, सुषमा बेडसे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मित्र-मैत्रिणींनी मनसोक्त नाच-गाणी करून आनंदाची पराकाष्ठा केली. जुन्या वर्गमित्रांच्या या एकत्र येण्याने शालेय जीवनातील आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.



