प्रभाकर पांडे प्रतिष्ठानतर्फे खेळाडू अदिती तळेगावकरला ५१ हजार रूपयांची मदत
छत्रपती संभाजीनगर ः अनेकदा गुणवंत आणि गरजू खेळाडू हे साधने, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या माहितीसह प्रशिक्षकांअभावी स्पर्धेत कमी पडतात. पूर्वी संस्थानिक आणि दानशूर व्यक्ती अशा खेळाडूंना सर्वोतोपरी मदत करत विजयापर्यंत पोहचत होते. आजही ग्रामीण भागासह शहरी भागात स्पर्धेच्या युगात गुणवंत खेळाडूंना पाठबळ देण्याची गरज असल्याची भावना घाटीचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी व्यक्त केली.

बेगमपूरा भागातील व शहरातील अनेक खेळाडूंचा गौरव प्रभाकर पांडे प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला, त्यावेळी डॉ शिवाजी सुक्रे हे बोलत होते. जिम्नॅस्टिक खेळाडू अदिती तळेगावकर हिला ५१ हजार रूपयांची मदत प्रभाकर पांडे प्रतिष्ठानच्या वतीने करत आली. यावेळी बास्केटबॉलपटू केतकी ढंगारे, कुस्तीपटू प्रांजल बरेटिये या दोन खेळाडूंना अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी दत्तक घेत जबाबदारी घेतली. प्रभाकर पांडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या खेळांडूना भरीव मदतीचे आश्वासन डॉ सुक्रे यांनी यावेळी दिले.
भारतीय जिम्नॅस्टिक संघ दक्षिण कोरियाला १९ नोव्हेंबर रोजी रवाना होत असून, त्या संघातील छत्रपती संभाजीनगरची खेळाडू अदिती तळेगावकर हिला प्रभाकर पांडे प्रतिष्ठान तर्फे ५१ हजार रुपये मदत एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ शिवाजीराव सुक्रे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय पाथ्रीकर, गणेश महासंघाचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी महापौर अशोक सायन्ना यादव, सतीश चौधरी, प्राचार्य मकरंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
तसेच गिरीश गोडबोले या सायकलपटूसह तिसगावची आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यूदोपटू श्रद्धा चोपडे हिच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. हनुमान व्यायाम शाळेचे मल्ल यांची निवड चंदीगड येथे होणार्या आंतर-विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांचा तसेच प्रशिक्षक डॉ हंसराज डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय बास्केटबॉलपटू खेळाडू केतकी ढंगारे, जलतरणामध्ये चेन्नई येथे होणार्या स्पर्धेसाठी निवड झालेले हरी सांगळे आणि अमृता निरंजन पांडे, विश्वेश जोशी, ऋतुजा गायकवाड या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी प्रभाकर पांडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड आशुतोष डंख, सचिव प्रमोद झाल्टे, कोषाध्यक्ष विनायक पांडे, प्रा फुलचंद सलामपुरे, जनार्दन भडके, राजेंद्रसिंग सोहोनी, विलासआप्पा संभाहारे, संदेश वाघ, विजय पुंड, दीपक कनिसे, सीताराम पहाडी, पूनमचंद चौधरी, परमेश्वर जैस्वाल, सुंदरलाल खरे, मुकुंद कुलकर्णी, अॅड निरंजन पांडे, धीरज पांडे, मदन नंदवनसिंग, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर जाधव, संतोष गुजराती, गणेश जोगळे, राजू जाफराबादी, संजय फतेलष्कर, गिर्यानंद भगत, संजय भातावाली, नंदू जोशी, सुदेश डोंगरे, संदेश डोंगरे, सुनील बागवाले आदी क्रीडाप्रेमी नागरिक व खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेळाडूंच्या मदतीसाठी प्रतिष्ठान सदैव प्रयत्नशील – अॅड आशुतोष डंख
प्रभाकर पांडे प्रतिष्ठानने यापूर्वी दहा खेळांडूना दत्तक घेतले असून, त्यांना दरमहा खानपान (खुराक) यासाठी आर्थिक मदत केली जाते. तसेच स्पोर्टस साहित्य, कपडे, बूट आदी साहित्य मोफत पुरविले जाते. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील गुणवंत खेळाडूंचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक व्हावा, यासाठी प्रतिष्ठान सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड आशुतोष डंख यांनी दिली.



