सीएसएमएसएस आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास एनसीआयएसएम व क्यूसीआयचे भारतातून १० वे तर राज्यातून २ रे ‘ए’ ग्रेड मूल्यांकन
छत्रपती संभाजीनगर ः कांचनवाडी, पैठण रोड येथील सीएसएमएसएस छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली द्वारे (एनसीआयएसएम, नवी दिल्ली) व भारतीय गुणवत्ता परिषद, नवी दिल्ली (क्यूसीआय) संपूर्ण भारतातील मूल्यांकन झालेल्या सर्व आयुर्वेद महाविद्यालयातून सीएसएमएसएस आयुर्वेद महाविद्यालय संपूर्ण भारतातून ‘ए’ ग्रेड प्राप्त झालेल्या यादीमध्ये प्रथम १० महाविद्यालयामध्ये १० वा क्रमांक मिळविलेला आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संलग्नित मूल्यांकन झालेल्या आयुर्वेद महाविद्यालयातून महाराष्ट्रात २ रे मूल्यांकन मिळाले आहे.
भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत ‘क्यूसीआय’ ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेचा उद्देश वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारणे हा आहे. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद, नवी दिल्ली यांच्या तपासणी पथकाने दिनांक १६ जुलै २०२५ ते १७ जुलै २०२५ या कालावधीत महाविद्यालय व रुग्णालयास निरीक्षणाला आलेल्या तीन सदस्यीय टीमने महाविद्यालय व रुग्णालयात मागील वर्षभरात रुग्णांचे उपचार, चाचण्यासह सर्व सोयी-सुविधांची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांच्या’ शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास ‘ए’ ग्रेड दिला आहे. आयुर्वेद महाविद्यालयास यापूर्वी नॅकचे बी++, आयएसओ नऊ मानांकन तसेच रुग्णालयास एनएबीएचचे मानांकन, ईट राईट प्रमाणपत्र, एफएसएसएआय प्रमाणित हॉस्पिटल किचन जागा, जीएमपी प्रमाणित फार्मसीला प्राप्त झालेले आहे.
क्यूसीआयचे ‘ए’ ग्रेड मूल्यांकनामुळे महाविद्यालयाकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे, रुग्णांची सुरक्षा, संशोधन, संस्थात्मक व्यवस्थापन आणि सेवा वितरण यासारख्या निकषांवर उत्कृष्ट कामगिरीमुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या तपासणीत संस्थेने प्रत्येक निकषावर उत्कृष्ट निकाल दिले आहेत. आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, सचिव पद्माकरराव मुळे यांनी दिली.
शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण केली असून ‘ क्यूसीआयचे ‘ए’ ग्रेड मूल्यांकनामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिक वाढली असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख यांनी दिली.
यावेळी संचालक तथा प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, मानव संसाधन व्यवस्थापक अनिल तायडे पाटील आणि जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील आदी उपस्थित होते.
…
भूषणावह घटना
सीएसएमएसएस आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास क्यूसीआयचे ‘ए’ ग्रेड मूल्यांकन मिळाले आहे, ही आमच्यासाठी भूषणावह आणि मान उंचावणारी घटना आहे. या मानांकनामुळे अनेक फायदे होणार असून राज्यातील या नामांकित महाविद्यालयास पूर्वीपासूनच नॅकचे बी++, आयएसओ नऊ मानांकन तसेच रुग्णालयास एनएबीएचचे मानांकन प्राप्त झालेले असून विद्यार्थ्यांना करिअर आणि उच्च शिक्षणासाठी निश्चितचं फायदा होईल. सीएसएमएसएस आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आमच्या अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक तसेच सचोटीने काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्न आणि परिश्रमाचे हे फलित आहे.

- रणजीत मुळे, अध्यक्ष, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था.



