ठाणे ः बदलापूर येथील कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूलचा दहावीतील विद्यार्थी मयांक जगताप याने छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.
या शानदार यशामुळे मयांक जगताप याने आता अरुणाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. शाळेच्या प्राचार्या सिस्टर विमल यांनी मयांकचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मयांकचे प्रशिक्षण प्रशिक्षक कौशिक गरवालीया आणि प्रमोद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे.



