मुंबई ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर मार्फत तिसऱ्या युवा आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भारतीय संघातील मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सेरेना सचिन म्हसकर हिचा विभागीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार (मुंबई उपनगर) यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ कटियार (मुंबई उपनगर) यांनी भविष्यात सेरेनाला तिच्या क्रीडा जीवनासाठी आवश्यक ती सर्व मदत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
सेरेनासोबत तिचे प्रशिक्षक अमित ताम्हणकर, आई मेघाली म्हसकर (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त) आणि वडील सचिन म्हसकर (आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू) उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर व क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे उपस्थित होत्या.



