छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र एमेच्योर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित १९ वी राज्यस्तरीय वरिष्ठ पुरुष व महिला नेटबॉल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात सुरू झाली. २८ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे उद्घाटन माननीय आप्पासाहेब शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यभरातून ४३ संघांचा सहभाग
या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सहभाग घेतला आहे. त्यात २५ पुरुष संघ आणि १८ महिला संघ सहभागी झाले असून, रोमांचक आणि दर्जेदार सामन्यांची उत्सुकता क्रीडाप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छा
उद्घाटन प्रसंगी नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव आणि निरीक्षक लक्ष्मण दातीर, तसेच विवेक सेन, शरीफ संजय उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश इंगळे, महासचिव शालिनी आंबटकर, उपाध्यक्ष योगेश वाघ, मिनेश महाजन, कोषाध्यक्ष विनय मून, सहसचिव सुशांत सूर्यवंशी, नरेश कळंबे, सदस्य शशिकला शालीन, शोभा मठपती, अमोल उरेल, शेख चांद आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील नेटबॉल संघटनांचे सचिव संभाजी गायकवाड, राजू भाई, प्रमोद पाटील, समीर चिखलकर, रामदास गिरी, विनय जाधव, जुबेर शेख, प्रवीण कुपटीकर, विठ्ठल महाले, के के भुतेकर, रमेश प्रधान यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
राष्ट्रीय स्तरावरून मोलाची साथ लाभली असून नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेटबॉल विकास समितीचे अध्यक्ष हरिओम कोशिक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, गणेश पळवदे यांनीही स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघाची मेहनत
स्पर्धेचे नियोजन, व्यवस्थापन आणि यशस्वी आयोजनासाठी सचिन दांडगे, संकेत भोंगारगे, अनिल मोठे, शुभम गायकवाड, हर्षवर्धन मगरे, तालीम अन्सारी, कुणाल नरवडे, आकाश बोर्डे, निलेश भगत, रोहन काळे, मनोज बनकर यांसह संपूर्ण आयोजन पथक अथक परिश्रम घेत आहे.
राज्याच्या नेटबॉल क्रीडा क्षेत्रातील हा भव्य सोहळा तीन दिवसीय रोमांचक सामन्यांच्या माध्यमातून रंगत जाणार असून, विजेत्या संघांना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय असा नेटबॉल मेळा छत्रपती संभाजीनगरात अनुभवायला मिळणार आहे.



