सातारा ः सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजीनियरिंग कॉलेज मध्ये झालेल्या शालेय कोल्हापूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत राजा राम बापू पाटील माध्यमिक प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज संख शाळेतील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षांखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत सृष्टी हिप्परगी द्वितीय क्रमांक व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू श्रेया हिप्परगी हिने १७ वर्षांखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावले. या कामगिरीमुळे त्यांची १२ ते १४ नोव्हेंबर रोजी सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या विभागीय स्पर्धेला प्रत्येक गटातून पाच जिल्हा व तीन महानगरपालिकेतून ४० विद्यार्थी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे मुख्य पंच आंतरराष्ट्रीय ऑर्बिटर पौर्णिमा उपळावीकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे नियोजन सातारा जिल्हा मुख्य क्रीडा अधिकारी संस्कृती मोरे यांनी केले.
या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे नीलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष बसवराज पाटील, शाळेचे मुख्याध्यापक आय बी कन्नुरे, पर्यवेक्षक पी एच बिरादार, क्रीडा शिक्षक ए एस बिराजदार, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



