पुणे शहर संघास विजेतेपद

  • By admin
  • October 30, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

राज्य ज्युनियर बाॅल बॅडमिंटन स्पर्धेत हिंगोली संघाला उपविजेतेपद

सोलापूर ः राज्य ज्युनियर बाॅल बॅडमिंटन स्पर्धेत पुणे महानगरपालिका संघाने विजेतेपद पटकाविले. हिंगोली संघाने उपविजेतेपद संपादन केले.

नेहरूनगर येथील जय जवान जय किसान सैनिक स्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यानी हिंगोलीचा ३५-२७, ३५-३० असा पराभव केला. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात अमरावती संघाने अहिल्यानगरवर ३५-२२, ३५-३० असा विजय मिळविला. या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडू म्हणून हिंगोली जिल्ह्याचा व्यंकटेश मालवटकर याला एक हजार रुपये रोख व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

सोलापूर शहर व जिल्हा बाॅल बॅडमिंटन असोसिएशन व श्री सुशीलकुमार शिंदे काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन नेहरूनगर याच्या संयुक्त विद्यमानाने व द महाराष्ट्र बाॅल बॅडमिंटन असोसिएशन याच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडली. बक्षीस वितरण जय जवान जय किसान सैनिक स्कूलचे प्राचार्य रवींद्र चव्हाण, द महाराष्ट्र राज्य बाॅल बॅडमिंटनचे सचिव अतुल इंगळे, कोषाध्यक्ष धोडिराज गोसावी, उपाध्यक्ष राजेंद्र भांडारकर, राजशेखर संगार, डॉ हरिश काळे, द सोलापूर बाॅल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश भुतडा, सचिव राजेंद्र माने, सहसचिव सुहास छंचुरे, कल्पना एकलंडगे याच्या हस्ते संपन्न झाला. या पारितोषिकाची ट्रॉफी वैभवी सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सागर शहा यांच्याकडून देण्यात आली.

या स्पर्धेसाठी निवास व्यवस्था व मैदान व्यवस्था नेहरूनगर बीपीएड कॉलेजचे सुभाष चव्हाण, विवेक चव्हाण व कार्तिक चव्हाण यांचे सहकार्य लाभले. आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्याकडून सर्व पंच व जिल्हा सचिव यांना भेटवस्तू देण्यात आली.

या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातील जिल्हा सचिव गौरव पावडे, शेखनुर, शिवानंद खंगार,मनिष इंगोले, कल्पना फुलसंगे, मंजुषा खापरे, निजामोद्धीन शेख, तुषार देवरे, एकनाथ सुरशे, अभिषेक खैरनार, विजय अवताडे, सचिन पाटील, सुनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शब्बीर शेख, शिवकुमार स्वामी, अजित पाटील, शिवानंद सुतार, रवींद्र चव्हाण यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले. शिवकुमार स्वामी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *