मुंबई ः युनाइटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया यांच्या विंटर कॅम्प (कराटे ऍडव्हेंचर कॅम्प) सीआर फार्म्स बोर्डी, डहाणू येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता.
या कॅम्पमध्ये कराटे, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग, स्विमिंग, बीच योगा, बीच ट्रेनिंग, ग्रुप बिल्डिंग गेम, किक बॉक्सिंग, रायफल शूटिंग, कॅम्प फायर, कमांडो ट्रेनिंग, मर्दानी स्पोर्ट्स, वुशू, बॉक्सिंग याचे चार दिवस प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये कॅम्पमध्ये शंभरपेक्षा जास्त जणांचा सहभाग होता. त्यामध्ये तेरा जणांनी ब्लॅक बेल्ट टेस्ट मध्ये प्रविण्य मिळवले. तसेच नऊ जणांनी पहिल्या डॅन मध्ये यश संपादन केले. वेदांत दीपक कायंदेकरला पहिला डॅन बेल्ट प्राप्त झाला. वेदांत हा यादवराव तासगांवकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिरिंग आणि टेकनिकाल कॉलेज, कर्जत येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असून तो योग देखील शिकवतो.
या सर्वांना डॉ मंदार पनवेलकर, स्मिता पनवेलकर, पियुष सदावर्ते, निलेश भोसले, प्रशांत गांगुर्डे, प्रतिक कारंडे, क्षमा कवली, प्रवीण पाटील, अवंतिका पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांची परीक्षा आणि तयारी करुन घेतली.



