 
            पुरुष–महिला दोन्ही गटात विजेतेपदावर शिक्कामोर्तब
बछत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना व नागपूर जिल्हा तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ३६व्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या पुरुष व महिला संघांनी विजेतेपदाची चमकदार कामगिरी साकारत सुवर्ण अक्षरात आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत एकूण ६ सुवर्ण, ३ रौप्य व ३ कांस्य पदकांची कमाई करून दोन्ही विभागात छत्रपती संभाजीनगर संघाने अव्वल स्थान पटकावले.
या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर वैयक्तिक प्रकारात विजयी ठरलेल्या अनेक खेळाडूंची आगामी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यात दिनेश पाटील, चीफ कंट्रोलर – ऑडिट अॅण्ड अकाउंट, भारत सरकार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. उदय डोंगरे (सचिव, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन) तसेच कुमार मसराम (अध्यक्ष, वुडबॉल असोसिएशन – महाराष्ट्र) यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.
मान्यवरांकडून शुभेच्छा
या भव्य यशाबद्दल माजी गृहराज्यमंत्री व महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष सतेज (बंटी) पाटील यांनी संघाचे कौतुक केले. तसेच क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, साई केंद्राच्या उपसंचालक मोनिका घुगे, सचिव डॉ उदय डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, प्रशिक्षक तुकाराम मेहेत्रे, संघाचे पदाधिकारी एस पी जवळकर, गोकुळ तांदळे, डॉ दिनेश वंजारे, महेश तवार, स्वप्नील शेळके, स्वप्नील तांगडे, सागर मगरे, अजय त्रिभुवन, तुषार आहेर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून उज्ज्वल भवितव्याबाबत शुभेच्छा दिल्या.
तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी केलेली ही घवघवीत कामगिरी राज्यभरात दखलपात्र ठरत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही असाच विजयी झेंडा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्पर्धेचा निकाल
वैयक्तिक गट
फॉईल प्रकार – मुले
- प्रथम – रोहन शहा
- द्वितीय – तेजस पाटील
- तृतीय – शाकीर सय्यदएपी – मुले
- द्वितीय – यश वाघ
सेबर प्रकार – मुले
- प्रथम – निखिल वाघ
- तृतीय – श्रेयस जाधव
- तृतीय – अभय शिंदे
फॉईल प्रकार – मुली
- प्रथम – गायत्री गोटे
- तृतीय – वैदेही लोहिया
सेबर प्रकार – मुली
- प्रथम – कशिश भराड
सांघिक स्पर्धा
फॉईल प्रकार – मुले (प्रथम)
– तेजस पाटील, रोहन शहा, शाकीर सय्यद, दुर्गेश जहागीरदार.
सेबर प्रकार – मुले (प्रथम)
– हर्षवर्धन आवताडे, श्रेयस जाधव, अभय शिंदे, निखिल वाघ
फॉईल प्रकार – मुली (प्रथम)
– वैदेही लोहिया, कनक भोजने, गायत्री गोटे, यशश्री वंजारे
ईप्पी प्रकार– मुली (तृतीय)
– सोम्या साठे, गार्गी डोंगरे, कार्तिकी राठोड, रूपाली शिंदे
सेबर प्रकार – मुली (द्वितीय)
– कशिश भराड, हर्षदा वंजारे, हर्षदा झोड, प्रेरणा जाधव



