 
            छत्रपती संभाजीनगर : एमजीएम गोल्फ लीग २०२५ ची धमाकेदार सुरुवात शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाली. स्पर्धेचे उद्घाटन दैनिक लोकमतचे संचालक करण दर्डा यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी मनपा आयुक्त जी श्रीकांत, एमजीएम गोल्फ क्लब संचालक रंजीत कक्कड, नितीन बागडिया, अतुल विभांडे, अनिल अग्रवाल, आदित्य जीवने, सुजित कक्कड आदी उपस्थित होते. करण दर्डा यांनी पहिला टी-शॉट मारून स्पर्धेचे उद्घाटन केले.

पहिल्या दिवसाच्या सामन्यांत वन वर्ल्ड गोल्फर्स बाय मंजीत प्राईड संघाने ९ गुणांसह आघाडी घेतली, तर पुणा लायन्स ५ गुणांसह दुसऱ्या आणि तायल वॉरियर्स ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. विविध कॅटेगिरीतील सामन्यांमध्ये ऋग्वेदी येवले, शैलेश कुदळे, सोहम बीज, हितेंद्र यादव, आकाश नागरे, आदित्य पुसळकर, धर्मेश करणी व मुराद तालिब यांनी प्रभावी खेळ सादर केला.
स्पर्धेचे व्यवस्थापन ऋशाली घाटणेकर, संदीप ढंगारे, उमेश राऊत, जययश शिंदे, अमन खान, रमझान शेख यांच्या मदतीने करण्यात येत आहे. शनिवारपासून पुढील सामने अधिक रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.



