सोलापूर ः ग्रीन फिट इंडिया स्पोर्ट्सच्या एकता दौड अंतर्गत श्रद्धा सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त झालेल्या एक दिवसीय रन स्पर्धेत राष्ट्रीय धावपटू साईश्वर व श्रद्धा केशव गुंटूक यांनी २१ किमी अंतर कमी वेळेत पूर्ण करत स्वतःचाच विक्रम मोडीत काढला.

जुळे सोलापुरातील स्वामी विवेकानंद प्रशालेतील साईश्वरने २१ किमी अंतर १ तास २७ मिनीटे २० सेकंदात तर तेवढेच अंतर श्रद्धाने अंतर १ तास ४० मिनिटे ३ सेकंदात पूर्ण केले. चॅम्पियन्स फिटनेस फिजिशियन एस एम एस हॉस्पिटलचे संस्थापक प्रशांत बटर यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे आयोजन केले.
ही स्पर्धा एसआरपीएफ कॅम्प सोरेगाव येथून सुरुवात करून जुळे सोलापूर भंडारी ग्राऊंड येथून पुन्हा एसआरपीएफ कॅम्प सोरेगाव अशा क्रमाने २१ किमी अंतर पार करण्यात आले. साईश्वर व श्रद्धा यांना सिनियर ऑलिम्पियन केशवराज सिंह, स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे, प्राचार्य चिदानंद माळी, क्रीडा प्रशिक्षक कृष्णा कोळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


