ठाणे ः शहापुर येथील श्री आदर्श व्यायाम मंडळ शाळेचे बुजुर्ग व्यायामपटू आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रामचंद्र भोईर यांना दुसरा रमेश चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेने भोईर यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.२ नोव्हेंबर रोजी ठाणे पुर्व येथील श्री आनंद भारती समाज आयोजित आनंद श्री २०२५ या स्पर्धेच्या वेळी भोईर यांना हा पुरस्कार देण्यात येईल. ११ मे १९८६ साली झालेल्या आनंद श्री स्पर्धेत भोईर यांनी किताब पटकावला होता. खास करुन ग्रामीण भागात युवा खेळाडू घडवण्याचे कार्य आणि या खेळाचा प्रसार करण्याचे मोठे काम भोईर गेली अनेक वर्ष करीत आहेत.


