कर्णधारपदी रुपेश महाजन आणि कन्या मराठे
नंदुरबार ः महाराष्ट्र राज्य लॅक्रॉस असोसिएशनच्या मान्यतेने व बीड जिल्हा लॅक्रॉस असोसिएशनच्या वतीने तिसरी सिनिअर गट राज्यस्तरीय लॅक्रॉस स्पर्धा बीड येथे १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नंदुरबार जिल्हा लॅक्रॉस असोसिएशनचा पुरुष व महिला संघ सहभागी होणार असून, जिल्ह्यातील खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आली आहे.
पुरुष संघात कर्णधार रुपेश महाजन, निखिल चौरे, दुर्गेश तवर, राज माळी, गौरव माळी, गौरव चौधरी, स्वरीत चौधरी, चेतन पाटील, हर्षल बेडसे, प्रतीक माळी, खुशाल धनगर, यशपाल पाटील, भावेश परदेशी, जतीन वाडीले, कुणाल धोंडगे यांचा समावेश आहे.
महिला संघात कर्णधार कन्या अमित मराठे, कृष्णाली दीपक बिर्ला, अंकिता प्रवीण चव्हाण, हृदिका सुनील मोरे, नम्रता विनोद मराठे, राजश्री गोकुळ राठोड, राजनंदिनी नागराज पाटील, राधिका संदीप पोवार यांची निवड करण्यात आली आहे.
दोन्ही संघ नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या खेळाडूंना जिल्हा लॅक्रॉस असोसिएशनचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, श्रॉफ हायस्कूलचे उपमुख्याध्यापक राजेश शहा, पोलीस दलाचे क्रीडा प्रमुख योगेश सोनवणे, संघटनेचे उपाध्यक्ष डॉ मयुर ठाकरे, जिल्हा सचिव भरत चौधरी, क्रिकेट संघटनेचे जगदीश वंजारी, बॉक्सिंग प्रशिक्षक मनीष सनेर, टेनीक्वाईट संघटनेचे उपाध्यक्ष श्रीराम मोडक तसेच नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल संघटनेचे सचिव डॉ जितेंद्र माळी यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी यांनी सर्व खेळाडूंना राज्यस्तरावर उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.


