राष्ट्रीय ज्युनियर डॉजबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

  • By admin
  • November 1, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : अहमदाबाद (गुजरात) येथे १ ते ३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर डॉजबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुलांचे, मुलींचे तसेच मिक्स असे तीनही संघ रवाना झाले. याबाबतची माहिती शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त महासचिव प्रा एकनाथ साळुंके यांनी दिली.

या स्पर्धेत देशभरातून ४८ संघ सहभाग नोंदवत आहेत. मुलांचा संघ कर्णधार वरद शिंपी (रायगड) तर मुलींच्या संघाचे नेतृत्व ऋतुजा राठोड (जालना) करणार आहे. मिक्स संघाचे नेतृत्व रुद्र निकम (अमरावती) यांच्याकडे आहे. प्रशिक्षक म्हणून अश्वजीत गायकवाड, महेंद्र मोटघरे व कुणाल राठोड तर व्यवस्थापक म्हणून रमेश शिंदे, रूपाली शिंदे आणि संगम डंगर यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र मुलांचा संघ

वरद शिंपी (कर्णधार, रायगड), श्रीकांत सपकाळ (उपकर्णधार, छत्रपती संभाजीनगर), रुद्र निकम, राजवर्धन चव्हाण, शर्विल सावंत, तनय घोपळे, पृथ्वीराज जाधव, आदित्य मते, अजय आडे, जयदीप खरात, नमित शहा, सार्थक इंगळे.

मुलींचा संघ

ऋतुजा राठोड (कर्णधार, जालना), वृंदा सिंह (उपकर्णधार, नाशिक), तिथी प्रामाणिक, सिद्धी कदम, श्रावणी दिवेकर, अचला जोरवार, भक्ती पाटील, संस्कृती साळुंके, अनया देशमुख, गौरी मालविया, कार्तिकी सुरंग, अनुश्री दोंदे.

मिक्स संघ
रुद्रा निकम (कर्णधार, अमरावती), तिथी प्रामाणिक (उपकर्णधार, रायगड), वरद शिंपी, श्रीकांत सपकाळ, ऋतुजा राठोड, वृंदा सिंह, प्रसाद दिवेकर, आयुष पागोरे, लावण्या पाळेकर, माही फडतरे, तीर्थ साळुंखे, अपूर्वा धिंदळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *