जळगाव : पुनीत बालन प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे जळगावात भव्य उदघाटन करण्यात आले. ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आयोजित व जळगाव जिल्हा हौशी ज्यूदो असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. राज्यातील ३० जिल्ह्यांमधील ३५० मुला-मुलींनी सहभाग नोंदवला असून, या स्पर्धेमुळे जळगाव जिल्ह्यात ज्यूदो खेळाला मोठे प्रोत्साहन मिळत आहे. अध्यक्ष व माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे, सचिव डॉ उमेश पाटील व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा ज्यूदोमय झाला आहे.

स्पर्धेचे उदघाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक, सचिव दत्ता आफळे, रवींद्र धर्माधिकारी, रवींद्र मेटकर, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, अनिल देशमुख, आंतरराष्ट्रीय पंच विजय यादव, टुर्नामेंट डायरेक्टर अमोल देसाई, तसेच प्रदीप तळवेलकर, अनिल देशमुख, अतुल बामनोदकर, सचिन देवळे, विकास पाटील, दर्शना लकानी आदी मान्यवर उपस्थित होते. ज्योती पाटील व महेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेच्या यशासाठी सचिव डॉ उमेश पाटील यांच्यासह कार्यसंघ परिश्रम घेत आहे. रविवारी स्पर्धेचा समारोप होत असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील, उज्ज्वल निकम व खासदार स्मिता वाघ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


